- सुरक्षित आणि आकर्षक ठेव योजना
- जलद व तात्काळ कर्ज सुविधा
- सर्वसमावेशक आर्थिक सेवा
बँकिंग सेवांमध्ये विश्वास, पारदर्शकता आणि सुलभता देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही ग्राहकांना जलद, अचूक आणि सोयीस्कर सेवा प्रदान करतो, ज्यामुळे प्रत्येक घटकापर्यंत आर्थिक सेवा सहज पोहोचतात.
ग्राहकांना खात्रीशीर, जलद, अचूक आणि आपुलकीची सेवा देवून कामात पारदर्शकता वविश्वासहर्ता आणून यशस्वी बँकिंग संस्था निर्माण करणे.
बँकिंग सेवेमध्ये नवीनतम तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करुन सभासद ग्राहकांना सहज सुलभ बँकिंग सेवांचा लाभ घेता येईल, अशी व्यवस्था तयार करणे. संस्थेच्या सेवांचा विस्तार करून जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत बँकिंग व अन्य आर्थिक सेवा पुरविणे.
समाजातील सर्व घटकांना विशेषतः महिलांना आर्थिक साक्षर करून त्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे सर्व प्रकारच्या बँकिंग, विमा, गुंतवणूक इत्यादी सेवा देणे.
आम्ही ग्राहकांना विविध प्रकारच्या बँकिंग, कर्ज, गुंतवणूक व विमा सेवा सुलभ आणि सुरक्षित पद्धतीने उपलब्ध करून देतो. पारदर्शकता, विश्वास आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक ग्राहकाला उत्कृष्ट सेवा देणे हेच आमचे ध्येय आहे.
आमच्या विविध ठेव योजनांद्वारे सुरक्षित गुंतवणूक आणि आकर्षक व्याजदर मिळवण्याची उत्तम संधी उपलब्ध आहे.
दर महिन्याला थोडी थोडी रक्कम जमा करून भविष्यासाठी मोठी बचत निर्माण करण्याची सोपी योजना.
नियमित उत्पन्नाची खात्री देणारी योजना, ज्यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य मिळते.
निश्चित कालावधीसाठी गुंतवणूक करून उच्च व्याजदरासह सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा मिळवा.
घर, वाहन, व्यवसाय किंवा वैयक्तिक गरजांसाठी जलद व सुलभ कर्ज सुविधा आम्ही प्रदान करतो.
जेष्ठ नागरिकांसाठी विशेष व्याजदर आणि सुरक्षित गुंतवणुकीची सुविधा देणारी योजना.

आमची संस्था संपूर्णतः संगणकीकृत बँकिंग सेवा, NEFT/RTGS/IMPS द्वारे सुरक्षित व्यवहार आणि SMS बँकिंग सुविधा उपलब्ध करून देते. महिलांचे नेतृत्व असलेले तज्ञ संचालक मंडळ व पारदर्शक कार्यपद्धतीमुळे ग्राहकांना विश्वासार्ह आणि जलद सेवा अनुभवता येते.

आम्ही आकर्षक ठेव योजना, उच्च व्याजदर आणि सुरक्षित परताव्यासह गुंतवणुकीची हमी देतो. तसेच तात्काळ कर्ज वितरण, पेन्शन सुविधा, जेष्ठ नागरिकांसाठी घरपोच सेवा आणि कमीत कमी कागदपत्रांमध्ये खाते उघडण्याची सोय उपलब्ध आहे.
मदतीची गरज आहे का? आमच्या सपोर्ट टीमशी आजच संपर्क साधा
आमच्या विविध सेवा, उपक्रम आणि यशस्वी कार्याची काही निवडक झलक येथे पाहता येईल, जी आमच्या गुणवत्तेची आणि विश्वासार्हतेची साक्ष देते.