या संस्थेची स्थापना दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी सभासदांच्या आर्थिक उन्नतीच्या उद्देशाने करण्यात आली. स्थापनेपासूनच संस्थेने विश्वास, पारदर्शकता आणि सहकार या मूलभूत तत्वांवर कार्य करत अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. संस्थेच्या उभारणीत मा. श्री रणजीत प्रकाश खांडेकर (Sir) आणि मा. श्री आप्पासो बळवंत जाधव (Sir) व त्यांचे विश्वासू सहकारी यांचा मोलाचा वाटा असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने प्रगतीचा भक्कम पाया घातला आहे. संस्थेने ठेवी व कर्ज व्यवहारामध्ये शिस्तबद्ध आणि संतुलित वाढ साधत सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. विविध बचत योजना, आकर्षक व्याजदर आणि सुलभ कर्ज सुविधा यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यावसायिक आणि महिलांना आर्थिक बळ मिळत आहे. गेल्या कालावधीत संस्थेने आर्थिक व्यवहारात पारदर्शकता राखत १००% वसुली आणि शून्य थकबाकी (NPA) साध्य करून आदर्श निर्माण केला आहे. हे यश संस्थेच्या कार्यक्षम व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांचे योगदान आणि सभासदांच्या सहकार्यामुळे शक्य झाले आहे. संस्था केवळ आर्थिक क्षेत्रापुरती मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकीही जपत आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, तसेच परीक्षेत अव्वल व उत्कृष्ट गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित केले जातात. यासोबतच सामाजिक सेवकांचा सत्कार करून समाजातील प्रेरणादायी व्यक्तींना गौरविण्याचे कार्यही संस्था सातत्याने करत आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून डिजिटल बँकिंग, RTGS/NEFT यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देत संस्था आपल्या सेवेत सातत्याने सुधारणा करत आहे. आज करवीर अर्बन ही संस्था विश्वासार्हता, प्रगती आणि सहकार यांचे प्रतीक बनत असून भविष्यातही संस्थेच्या सभासद व खातेदार यांच्या सेवेसाठी लवकरच शाखा विस्तार करण्याचा मानस आहे. सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवण्याचा संस्थेचा दृढ संकल्प आहे. “जय हिंद..! जय सहकार..!”

देशाच्या इतर भागाप्रमाणेच कोल्हापूरच्या जनतेला सुद्धा ग्रामीण शहरी बँका व इतर सहकारी संस्था यांचा लाभ मिळत आहे. समाजातील सर्व घटकांचा विशेषतः महिला, तरुण व जेष्ठ नागरिक यांच्या उत्कर्षासाठी व त्यांना आर्थिक सहकार्य करण्यासाठी करवीर अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना झाली आहे. सहकारी चळवळींच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्रराज्यातील व देशातील आघाडीच्या जिल्ह्यांपैकी एक आहे. सहकार चळवळीमुळे जिल्ह्याचा विविध क्षेत्रात क्रांतिकारी विकास झाला आहे. स्वातंत्र्य पूर्व काळापासून कोल्हापूर जिल्ह्यात सहकार चळवळ खूप चांगल्या पद्धतीने रुजली आहे. याचे सर्व श्रेय राजर्षी छत्रपती शाहू महाराज व त्यांच्या दूरदृष्टीला जाते. सहकार चळवळ यशस्वी करण्यासाठी या क्षेत्रातील संस्कार जपले पाहिजेत, यासाठी ``विना सहकार, नाही उद्धार`` या ब्रीद वाक्यानुसार समाजातील सर्व घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी संस्थेच्या ठेवीदार व सभासदांना उत्कृष्ट बँकिंग व संलग्न सेवा प्रदान करण्याचा आमचा प्रयत्न राहील. सहकारातील संस्कार मूल्ये जपत चळवळ बळकट करण्याच्या दृष्टीने आमची संस्था काम करेल असा आमचा विश्वास आहे.
संस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी अनुभवी व तज्ज्ञ संचालक मंडळ कार्यरत आहे. पारदर्शकता, विश्वास आणि सहकार मूल्ये जपत संस्था सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.